Type Here to Get Search Results !

लक्ष्मण फुलारी यांची भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड


 लक्ष्मण फुलारी यांची भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड 


उदगीर ( अरुण उजेडकर ) उदगीर तालुक्यातील मौजे शेकापूर येथील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा जिल्हा पातळीवर विविध पदे भूषवून अत्यंत दर्जेदार काम करणारे कार्यकर्ते लक्ष्मण मल्लिकार्जुन फुलारी (भालके) यांची निवड भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा लातूर च्या जिल्हा सरचिटणीस पदी करण्यात आल्याचे पत्र ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव चिलकुरे यांनी दिले आहे. 

यापूर्वी लक्ष्मण फुलारी (भालके) यांनी जिल्हा पातळीवर किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत दर्जेदार काम करून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन उभारणे, प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरणे, अशा पद्धतीची अनेक आंदोलने त्यांनी आतापर्यंत यशस्वी करून दाखवले आहेत. पक्ष संघटनेतील त्यांचे कार्य विचारात घेऊन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांना जिल्हा सरचिटणीस पदावर काम करण्याची संधी दिली आहे. आपण सक्रिय राहून जिल्हाभरात भारतीय जनता पार्टीचे संघटन वाढवणे म्हणजेच राष्ट्रीयत्वाचे कार्य करणे हे धोरण ठेवावे, या राष्ट्रीय कार्यात आपण मनापासून सहभागी व्हावे, अशी अपेक्षा निवड पत्रामध्ये दिलेली आहे. 

सध्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान चालू आहे. या अभियानाच्या दरम्यानच सदरील निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर प्रकाश येरमे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, विनायकराव बेंबडे, पंचायत समितीचे उपसभापती भोसले, रामदास बेंबडे,सोमनाथपूर जिल्हा परिषद सदस्य भुजबळे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. या निवडीबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लक्ष्मण फुलारी यांचा सत्कारही करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की,

सदरील निवड ही माझ्यासाठी अभिमानाची आणि नव्याने काम करण्याची संधी समजतो. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून मी एकनिष्ठपणे भारतीय जनता पक्षाचे काम आतापर्यंत केलेले आहे, भविष्यातही करत राहीन असे सांगितले. 

लक्ष्मण फुलारी (भालके) यांनी ग्रंथालय क्षेत्रातही गेल्या 25 वर्षापासून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे त्यांना मिळालेल्या या पदाबद्दल ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी ही आनंद व्यक्त करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. संघटन कुशल नेतृत्व असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार ही दांडगा आहे. संपूर्ण जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments