Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत नागलगाव येथे “समाधान शिबिर” यशस्वी






  ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत नागलगाव येथे “समाधान शिबिर” यशस्वी

उदगीर, (अरुण उजेडकर)  : उदगीर तालुक्यातील महसूल मंडळ विभाग नागलगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत “समाधान शिबिर” उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात नागरिकांना विविध महसूल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.

सदर शिबिरामध्ये पुढीलप्रमाणे कामकाज करण्यात आले :

फेरफार निकाली प्रकरणे : ८२

सातबारा दुरुस्ती अर्ज स्वीकृत : २३

सातबारा वाटप : ४८३

आठवणी (८-अ) वाटप : ४०३

प्रमाणपत्र वाटप : ३८६

‘एक खिडकी योजना’ अंतर्गत निकाली अर्ज : ७२९

कमी-जास्त पत्रिका अंमलबजावणी : ०१

शिधापत्रिका वाटप : ५६७

या शिबिरादरम्यान शासकीय विभागातील चालू कामकाजाचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना अधिक तत्पर, पारदर्शक व प्रभावी सेवा देण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक वेगाने व अचूकतेने करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी मा. सुशांत शिंदे (उपविभागीय अधिकारी, उदगीर) यांनी मार्गदर्शन करताना जनतेच्या समस्या वेळेत सोडविणे, तांत्रिक अडचणी दूर करून सेवा सुलभ करणे, विद्यार्थी व पालकांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे तात्काळ काढून घेणे, रस्ते विषयक तक्रारींचे निवारण तसेच निवडणूक विभागांतर्गत मतदार पडताळणी करण्याचे आवाहन केले.

सदर कार्यक्रमास कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी व त्यांचे कर्मचारी, पंचायत समिती विभाग, प्रकल्प अधिकारी (महिला व बालकल्याण), उपाधीक्षक भूमि अभिलेख विभाग, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आशा कार्यकर्त्या तसेच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. राम बोरगावकर (तहसीलदार, उदगीर) यांनी केले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन मंडळ अधिकारी श्री. उद्धव जाधव तसेच नागलगाव मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी केले.

सदर शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना जलद व सुलभ सेवा देण्याचा उद्देश सफल झाला असून, सर्वांनी एकत्रितपणे कार्य करत महसूल विभागाची कार्यक्षमता अधिक वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments