Type Here to Get Search Results !

दुहेरी घरफोडी; अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

                                                                                         उदगीर( अरुण उजेडकर) 
 दुहेरी घरफोडी; अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

उदगीर शहरातील तथागत नगर व लक्ष्मी नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन घरांचे कुलूप तोडून मोठी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. या दोन्ही घरफोड्यांमध्ये सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ₹२,०९,२५०/- किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments