Type Here to Get Search Results !

बॅनर मुक्त उदगीर अभियानात भेदभाव केल्यास आंदोलन करणार- बाबासाहेब सुर्यवंशी


 

उदगीर/ अरुण उजेडकर 

उदगीर नगर पालिका प्रशासनाने बॅनर मुक्त उदगीर अभियान सुरू केले. गेल्या काही दिवसांपासून शहरात कोणतेच बॅनर लागत नाहीत. नुकतेच महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती पार पडली. याही वेळेस उदगीर शहरात बॅनर लागले नाहीत. शिवाय  उदगीर  शहरात उभारण्यात आलेल्या कमानीही बॅनर मुक्त होत्या. मात्र पालिका प्रशासन या अभियानात भेदभाव करीत असल्याचे दिसते. पुढील काळातही बॅनर मुक्त शहर न राहिल्यास बाबासाहेब सुर्यवंशी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

उदगीर नगर परिषदेने बॅनर मुक्त अभियान राबवित उदगीर शहरातील सर्व बॅनर काढण्यात आले. पालिका प्रशासनाने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॅनर लावण्यास बंदी घालण्यात आली. मात्र  दि. 17 एप्रिल रोजी उभारण्यात येत असलेल्या कमानीवर बॅनर लावले जात आहेत. शिवाय शहरातील अनेक भागात बॅनर लावले आहेत. पालीका प्रशासन असा दुज्याभाव करीत असल्याच त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देत. शहरातील सर्व बॅनर तात्काळ काढण्याची मागणी केली आहे.

पालिका प्रशासन जात- धर्म पाहून बॅनर व कमानीवर बॅनर लावण्याची मुभा देण्यात येत असले तर महाराष्ट्र संघर्ष अभियान या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा  इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. या निवेदनावर बाबासाहेब सुर्यवंशी यांची स्वाक्षरी आहे. उदगीर पालिका प्रशासन हे जातीवादी प्रशासन आहे की काय असा  प्रश्न निर्माण झाला आहे. 

Post a Comment

0 Comments