उदगीर/संपादक-: उदगीर तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID व आधार तपशील 16 मार्चपूर्वी जमा करावेत – तहसीलदार राम बोरगावकर
“उदगीर तालुक्यातील सामाजीक विशेष सहाय योजनेअंतर्गत योजनेच्या दिव्यांग लाभार्थी यांनी UDID नंबर असलेले दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्डची छायाप्रत व आधारलीक असलेला मोबाईल नं. संबंधीत गावचे ग्राम महसुल अधीकारी (तलाठी) यांचेकडे जमा करावे, तहसीलदार राम बोरगावकर यांचे आवाहन”
राज्यातील दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणा-या विविध योजनंचा लाभ सुलभ व पारदर्शक पध्दतीने देण्यासाठी दिव्यांग लाभार्थीचे वैशिष्टयपुर्ण ओळखपत्र, युडीआयडी कार्ड, ई-दिव्यांग प्रमाणपत्र व आधार कार्ड संबंधित योजनांशी संलग्न करणे आवश्यक करण्यात आले आहे.
राज्य शासनामार्फत दिव्यांग व्यक्तीसाठी राबविण्यात येणा-या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना इ योजनेच्या दिव्यांग लाभार्थी यांनी त्यांचे युडीआयडी कार्ड / दिव्यांगाचे प्रमाणपत्र व आधार काडांची प्रत आधारलीक असलेला मोबाईल नं. संबंधीत गावचे ग्राम महसुल अधीकारी (तलाठी) यांचेकडे दि. 16 मार्च 2026 पुर्वी जमा करावे असे आवाहान मा. तहसीलदार राम बोरगावकर साहेब यांनी केले आहे.
संबंधित तहसील कार्यालयात तात्काळ जमा करावी.

Post a Comment
0 Comments