लातूर प्रतिनिधी / विश्वशांती केंद्र आळंदी आणि माईर्स एमआयटी पुणे यांच्या तर्फे राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा २०२६ चे आयोजन आज रामेश्वर (रुई) येथे करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन आज सकाळी ९ वाजता होणार असून पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या स्पर्धेत महावीर केसरी गटातील विजेत्या मल्लास १ लाख २५ हजार रुपये रोख, चांदीची गदा आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
समारंभास अर्जुन पुरस्कार विजेते नरसिंग यादव, हिंद केसरी जगदीश कालीरमण यांच्यासह अनेक नामवंत मल्ल उपस्थित राहणार आहेत.
राज्यभरातील तसेच देशातील नामवंत मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार असून क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



Post a Comment
0 Comments