Type Here to Get Search Results !

उदगीरवासीयांच्या वतीने डॉ. प्रीतमकुमार भाले यांचा भव्य सत्कार सोहळा


 उदगीरवासीयांच्या वतीने डॉ. प्रीतमकुमार भाले यांचा भव्य सत्कार सोहळा

उदगीर/ संपादक. जळकोट तालुक्यातील  भाले परिवारांचा मानबिंदू ठरलेले आणि प्रतिष्ठित यू.पी.एस.सी. (UPSC) परीक्षेत यशाची पताका फडकवून उदगीरचे नाव देशभर उज्ज्वल करणारे डॉ. प्रीतमकुमार भाले यांचा उदगीरवासीयांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

या सोहळ्याचे आयोजन उदगीर शहरातील विविध सामाजिक संस्था, मान्यवर नागरिक आणि तरुणांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. कार्यक्रमास शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. प्रीतमकुमार भाले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. भाले यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि चिकाटीचे कौतुक केले. ग्रामीण भागातून येऊन कठोर परिश्रमाच्या जोरावर यू.पी.एस.सी. सारख्या कठीण परीक्षेत यश संपादन करणे ही उदगीरकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

सत्कार स्वीकारताना डॉ. प्रीतमकुमार भाले यांनी आपल्या यशामागील प्रेरणा, अभ्यासातील सातत्य आणि कुटुंबीय तसेच गुरुजनांचे मार्गदर्शन यांचा उल्लेख केला. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून प्रामाणिक प्रयत्न केल्यास कोणतीही परीक्षा अशक्य नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून डॉ. भाले यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांसाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट  जयवर्धन  भाले  यांच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments