Type Here to Get Search Results !

उदगीरमध्ये गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ७.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त



 उदगीरमध्ये गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ७.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

उदगीर (प्रतिनिधी):

उदगीर तालुक्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व पानमसाल्याच्या बेकायदेशीर वाहतुकीवर उदगीर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून तब्बल ७ लाख ३३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ मार्च २०२५ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास उमा चौक परिसरात, सिटी बार समोर (उदगीर शहरापासून पश्चिमेस अंदाजे २ कि.मी.) ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला, सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा यांची साठवणूक व वाहतूक केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ३३ हजार १२० रुपयांचा गुटखा व पानमसाला तसेच मारुती सुझुकी कंपनीची सुपर कॅरी (क्रमांक MH-24-BW-0916) किंमत अंदाजे ६ लाख रुपये असा एकूण ७ लाख ३३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपींची नावे 

शेख आवेज युनुस (वय २१ वर्ष), रा. भारत कॉलनी, काळेगाव रोड, अहमदपूर, ता. अहमदपूर

सगीरखान जलालोदीन खान (वय २९ वर्ष), रा. गवळी गल्ली, अहमदपूर, ता. अहमदपूर

सदर गुन्हा मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या आदेशानुसार दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकर हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments