Type Here to Get Search Results !

दलित पँथर पक्षात युवक नेतृत्वाला नवी उर्जाभरणी गौतम दादा भगवान सोमवंशी यांची ‘महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष’ पदी नियुक्ती


 उदगीर प्रतिनिधी/  समाजक्रांती, समता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांसाठी लढणाऱ्या दलित पँथर पक्षाने युवक नेतृत्वाला बळकटी देत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पक्षाच्या महाराष्ट्र राज्यातील युवक संघटनात्मक विस्तारासाठी गौतमदादा भगवान सोमवंशी यांची ‘महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष प्रमुख डॉ. स्वप्निल ढसाळ आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संगीता विष्णू ढसाळ यांच्या स्वाक्षरीने हा नियुक्तिपत्र आज जाहीर करण्यात आला.

पँथर पक्षाचे संस्थापक तथा साहित्यिक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या क्रांतिकारी विचारधारेवर आधारित संघटनाला युवा पिढीचे सक्षम नेतृत्व लाभावे या हेतूने ही जबाबदारी देण्यात आल्याचे पक्षाने सांगितले.

नियुक्तीपत्रात सोमवंशी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना त्यांच्याकडून पक्षाची विचारधारा—समता, बंधुता, मानवतावाद, सर्वधर्म समभाव—या तत्त्वांवर आधारित जनसंपर्क आणि संघटनविस्ताराचे काम अधिक प्रभावीपणे उभारण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नरेंद्र तिवारी, प्रदेश संघटक अक्षय (आण्णा) अडसूळ तसेच पक्षाचे सर्व उच्च अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली युवक संघटन अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट या नियुक्तीमागे असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले.

गौतम दादा सोमवंशी यांच्या नियुक्तीने राज्यातील दलित पँथर युवक संघटनेला नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सामाजिक अन्यायाविरोधात संघर्ष, शिक्षण-जागरूकता, युवक संघटन आणि समानतेच्या राजकारणासाठी पुढील काळात निर्णायक उपक्रम हाती घेण्याचे संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत.

 

Post a Comment

0 Comments