Type Here to Get Search Results !

उदयगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंची विद्यापीठ क्रीडा महोत्सव संघात निवड*


 उदगीर प्रतिनिधी /

उदगीर- महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या ऋतुजा सूर्यवंशी (टेबल टेनिस) राठोड वैष्णवी (ॲथलेटिक्स) शुभम शिंदे, रोहन कोरे (खो-खो) ह्या खेळाडूची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा महोत्सव संघात निवड झाली आहे. सदर खेळाडू दिनांक 4 ते 8 डिसेंबर 2025 या कालावधीत नांदेड विद्यापीठ येथे होणाऱ्या 27 वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या खेळाडूस क्रीडा संचालक प्रा.सतिश मुंढे, प्रा. रमजू शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments