उदगीर(प्रतिनिधी)
आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या 231 व्या जयंतीच्या निमित्ताने उदगीर येथील शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांची व्यापक बैठक संपन्न झाली. यावर्षी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष बन्सीलाल दादा कांबळे हे होते. जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी समाज बांधवांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही केले. या बैठकीसाठी संग्राम अंधारे, अजित कांबळे, बंटी कसबे, रवींद्र बेद्रे, पप्पू गायकवाड, बालाजी रणदिवे, रामेश्वर शिंदे, मारुती गायकवाड, पांडुरंग कांबळे, बालाजी अंधारे, दीपक गायकवाड, साहिल मसुरे यांच्यासह समाजातील सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक जयंती संदर्भामध्ये आणि कार्यक्रमाच्या रूपरेषेच्या अनुषंगाने विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच या सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख युवा नेते तथा उद्योजक स्वप्निल अण्णा जाधव यांची एकमुखाने निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष म्हणून करण संग्राम अंधारे यांची निवड करण्यात आली. इतर कार्यकारिणीमध्ये सचिव म्हणून अरविंद शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी सतीश पाटील, रोहित बोईनवाड, व्यंकट वाघमारे, पांडुरंग कांबळे, सावंत टाकसाळ, माधव शेळके यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी रामेश्वर शिंदे आणि दयानंद कांबळे यांची निवड झाली. तसेच संघटक म्हणून राजू सूर्यवंशी, मारुती गायकवाड, रवींद्र कोचेवाड यांची तर सहसंघटक म्हणून नागेश गुंडीले, प्रेम सूर्यवंशी, राजू पल्ले सहसचिव म्हणून उद्धव गायकवाड, नागनाथ जरीपटके, दयानंद गायकवाड, ओमकार वाघमारे, महिला प्रमुख होऊन रेणुका उफाडे, सुलोचना जाधव, अंशाबाई कांबळे, रेश्मा ताई कांबळे आणि संयोजक म्हणून रवींद्र मनोहर बेद्रे यांची निवड करण्यात आली. आयोजक म्हणून पप्पू यादव गायकवाड हे राहणार आहेत. अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.

Post a Comment
0 Comments