Type Here to Get Search Results !

दि. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोध व उपचार मोहीम राबवण्यात येणार आहे



 उदगीर प्रतिनिधी :
 सहाय्यक संचालक कुष्ठरोग लातूर डॉ वैशाली मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुके,गाव, वाड्या,तांडे येथे कुष्ठरोग शोध व उपचार मोहीम(LCDC) दि 17नोव्हेंबर ते2 डिसेंबर 2025 या कालावधीत राबवण्यात येणार आहे या अनुष्गाने जिल्हास्तरीय अधिकारी,कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व कर्मचारी,अधिकारी, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सर्वेक्षणातील स्वयंसेवक,आशा यांना प्रशिक्षण देण्यात आले .

कुष्ठरोगाबाबत आज सुद्धा समाजामध्ये गैर समज आहे .परंतु कुष्ठरोग हा जंतू पासून होणारा रोग आहे .कुष्ठरोग हा औषधोपचार घेतल्याने पूर्णपणे विनविकृती दुरुस्त होतो व रुग्ण सर्वसामान्य जीवन जगू शकतो.या साठी कुष्ठरुग्णाना लवकरात लवकर शोधून औषधोपचाराखाली आणणे गरजेचे आहे (एमडीटी) बहुविधीऔषध उपचाराने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो तरी आपल्या चॅनलच्या द्वारे मी सर्व जनतेला आवाहन करतो की जर आपल्या अंगावर न खाजणारा न दुखणारा चट्टा असेल तर आपल्या घरी येणाऱ्या स्वयंसेवकाकडून तपासून घ्यावे ज्यामुळे समाजामध्ये दडलेले कुष्ठरुग्ण समोर येऊन औषधोपचार घेतील व  शासनाच्या योजनेप्रमाणे 2027 पर्यंत कुष्ठरोगाची साखळी तोडण्यासाठी यशस्वी होऊ. कुष्ठरोग यापुढे  (नोटीफायबल डिसिज) म्हणून घोषित करण्यात आले आहे तरी यापुढे. नवीन कुष्ठरुग्ण निघाल्यानंतर सर्व वैद्यकीय व्यवसायिक यांना कुष्ठरोगाबाबत माहिती देणे बंधनकारक आहे.LCDC या मोहिमेला यशस्वी होण्यासाठी जिल्हास्तरावरून डॉक्टर कदम सर डॉक्टर सावंत सर श्री फुले सर तालुका आरोग्य अधिकारी 

डॉ सचिन राठोड सर जळकोट टी.एच. ओ डॉक्टर पवार सर उदगीर व जळकोट चे तालुका कुष्ठरोग पर्यवेक्षक व्ही . व्हि.भातांबरेकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन माहिती दिली

Post a Comment

0 Comments