उदगीर प्रतिनिधी
एम व्ही पाटील सीबीएसई पब्लिक स्कूलचा विद्यार्थी कृष्णा चौधरी यांची राज्यस्तरीय 100 मीटर धावणे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दिनांक. 05/11/2025 रोजी विभागीय स्तरीय 100 मीटर धावणे स्पर्धेचे आयोजन लातूर येथील क्रीडा संकुलनावर करण्यात आले होते एम व्ही पाटील सीबीएसई पब्लिक स्कूलचा विद्यार्थी कृष्णा चौधरी यांनी आपल्या धावण्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला त्यामुळे त्याची निवड राज्यस्तरीय 100 मीटर धावणे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कृष्णा चौधरी यांची राज्यस्तरी स्पर्धेमध्ये निवड झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस बसवराज म.पाटील नागराळकर.उपाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर. व विभाग प्रमुख गणेश हुडे यांनी अभिनंदन केले
खूप कमी वेळामध्ये मुलाला प्रशिक्षण देऊन त्याच्याकडून मेहनत करून घेणे खूप महत्त्वाचं असतं ते मिथुन शिंदे यांनी करून दाखवले आहे.


Post a Comment
0 Comments