Type Here to Get Search Results !

अटल म्हैस चोर जेरबंद:वाढवणा पोलिसांची दमदार कामगिरी

      उदगीर/ वाढवणा प्रतिनिधी:
 पोलीस स्टेशन वाढवणा गुन्हा रजिस्टर नंबर 270/25 कलम 303(2) भारतीय न्यायसंहिता अन्वये दिनांक 14.10. 2025 रोजी गुन्हा दाखल होता तसेच नळगीर भागातून म्हैस चोरीचे गुन्हे यापूर्वी देखील पोलीस तपास करीत असताना तपासामध्ये गोपनीय माहिती मिळाली. गोपनीय माहितीच्या अनुषंगाने सपोनी एस पी गायकवाड, पोउपनी हालसे, नळगीर बीटचे पोलीस हवालदार 1332 इकराम उजेडे, पोलीस अंमलदार बळदे, बोइनवाड, यांनी माहिती काढून मुराद मोलासाब खादूभाई राहणार नळगीर तालुका उदगीर यास ताब्यात घेतला आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीताकडे विचारपूस करता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे गुन्हा कबूल केल्यानंतर सदर आरोपीस दिनांक 2. 11. 25 रोजी गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे अटक केल्यानंतर सदर आरोपीने गुन्ह्यातील एक म्हैस व वासरू चोरली आहे ती कंधार येथे दिल्याची समजले तेथून एक म्हैस व एक वासरू मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच यापूर्वी देखील गावातील सलगरे यांचे गुरन 152/25 मधील दोन म्हैस चोरल्याचे कबूल केले आहे आरोपी कडे अधिक तपास चालू असून आरोपीने गुन्हा वापरलेले वाहन बोलेरो पिकअप एम एच 05 बी एच 1921 जिचे किंमत तीन लाख रुपये चोरी केलेली म्हैस साठ हजार रुपये व वासरू पाच हजार रुपये असा एकूण 3,65,000/ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी api एस पी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोउपनी हालसे, नळगीर बीटचे पोलिस हवालदार 1332 इकराम उजेडे, बळदे,बोईनवाड, यांनी केलेली आहे आणखीन देखील इतर म्हैस चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments