उदगीर प्रतिनिधी- एम व्ही पाटील सीबीएसई स्कूलचा विद्यार्थी कृष्णा चौधरी हा 100 मीटर धावणे स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आला आहे.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा लातूर येथील क्रीडा संकुलनावर आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत एम व्ही पाटील सीबीएसई पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
कृष्णा चौधरी याने 100 मीटर धावणे स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे त्याचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस मा. बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, विभाग प्रमुख गणेश हुडे, कृष्णा वासुदेव, क्रीडा शिक्षक मिथुन शिंदे, माधवी मॅडम, पठाण मॅडम, छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयातील क्रीडा शिक्षक इतर मान्यवरांनी केले आहे.
क्रीडा शिक्षक मिथुन शिंदे यांच्या परिश्रमाचे सुद्धा विशेष कौतुक करण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments