हावगीस्वामीत रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन
उदगीर (प्रतिनिधी)
श्री हावगीस्वामी महाविद्यालयात रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन व जल प्रदूषण आणि जलशुद्धीकरण या भितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.ए. काळगापुरे, तर मंचावर उपप्राचार्य डॉ. एन.जी.एमेकर,उद्घाटक म्हणून डॉ.म.ई. तंगावार,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संजय शिंदे व रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.वसंत पवार उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात पठाण आसमा,महानंदा हुसनाळे यांच्या स्वागतगीताने झाले.प्रास्ताविक डॉ.वसंत पवार यांनी केले.त्यानंतर भीतीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. उद्घाटनपर मनोगतात बोलताना डॉ.म.ई.तंगावार म्हणाले, विज्ञानामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व आहे. इथे काटेकोरपणे मूल्यमापन केले जाते. रसायनशास्त्रात खूप अशा रोजगारा च्या संधी दडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपलं करियर करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून जल परीक्षण व माती परीक्षण यासारख्या उपक्रमात सहभाग नोंदवावा.
प्रमुख पाहुणे डॉ.संजय शिंदे म्हणाले, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. जीवनात आपण नेहमी सकारात्मक विचार करून जगलं पाहिजे. त्यामुळे एक प्रकारची ऊर्जा आपल्याला मिळते.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.ए.ए. काळगापुरे म्हणाले, पाणी जीवनाचा एक अविभाज्य असा भाग आहे. त्यामुळे पाण्याच्या शुद्धीकरणावर जास्त प्रयोग झाले पाहिजेत. यासंबंधी जनतेमध्ये सतत जनजागृती करणे काळाची गरज आहे.
याप्रसंगी पठाण सुमय्या, पठाण आसमा, महानंदा हुसनाळे या विद्यार्थ्यांनी देखील पाणी या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.शिवराज नागशंकरे, प्रा.अनिता हुलसूरकर,वैष्णवी तांबोळकर, ऋषिकेश लखणे, आदित्य टोम्पे, वैष्णवी कदम आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमास प्राध्यापक,प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यलक्ष्मी अंबेसंगे यांनी तर आभार सादिया सय्यद यांनी मानले.

Post a Comment
0 Comments