उठ भीमसैनिका जगा हो आंबेडकर चळवळीचा धागा हो!
उदगीरच्या मुर्दाड प्रशासनावर हल्लाबोल ! डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे राजकारण करीत अनेकजण आमदार झाले. पण आंबेडकरी समाजास न्याय भेटलाच नाही. बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा रस्त्यांच्या मध्यभागी व्हावे यासाठी तीन दशके आंदोलन सुरू होते. अनेकजण जेल भोगले, गुन्हेदाखल झाले. शहिद झाले मात्र त्यांची स्वप्न; स्वप्नच राहील. कारण विद्यमान आमदार संजयभाऊ बनसोडे यांनी पुतळा आहे त्याठिकाणी भव्यदिव्य करण्याचे त्यासमोर अशोकस्तंभ उभारण्याचे अश्वासन दिले. पुतळा परिसर भव्य झाला मात्र पुतळ्याच्या गुणवंतेवर अनेकजण प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यामुळे पुतळ्याची विधीवत पाहाणी करावी, तसेच पुतळ्यासमोर भव्य अशोकस्तंभ तात्काळ उभे करावे. या आपल्या न्यायिक मागणीसाठी प्रशासनावर हल्लाबोल करण्यासाठी दि. २८ ऑगस्ट रोजी रितसर दिलेल्या निवेदनानुसार मुख्याधिकाऱ्यांची भेट घेवून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन करावयाचे आहे. एक सच्चा भीमसैनिक म्हणून आपली उपस्थितीत प्रार्थनीय आहे.
आपला भीमसैनिक
आदर्श ( सोनू ) पिंपरे

Post a Comment
0 Comments