उदगीर प्रतिनिधी/ दिनांक 27.8.2025रोजी मोजे बोरगाव तालुका उदगीर येथे द वर्ल्ड मिशन चर्च ऑफ गॉड तर्फे पूरग्रस्त बोरगाव येथील कुटुंबांना अन्न धान्य वाटप करून त्यांना या संकट समयी धीर देण्याचा प्रयत्न करण्यात आला . चर्च ऑफ गॉड ही एक इंटरनॅशनल संस्था आहे जी जगात 175 पेक्षा जास्त देशामध्ये कार्य करते या चर्च ची स्थापना दुसऱ्यांदा आलेले ख्रिस्त आन सांग होंग यांच्याद्वारे इ. स . 1964 मध्ये साऊथ कोरिया मध्ये स्थापन करण्यात आले व या वर्षी 61 वा वर्धापन वर्ष साजरा करण्यात आला .बायबल द्वारे ख्रिस्ताने सांगितले आहे की.(तुमच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करा)या शिकवणी नुसार चर्च विविध प्रकारे प्रेम आणि सेवा करते आज पर्यंत चर्चने रक्तदान शिबिरे,पर्यावरण स्वच्छता, वंचितांना मदत करणे,भूकंप ग्रस्तान मदत,आपत्ती निवारण व सांस्कृतिक समृद्धी आश्या ३१,१०० हून अधिक उपक्रमांद्वारे जागतिक विकास आणि सुसंवाद साधण्यात योगदान दिले आहे.या निःस्वार्थ प्रयत्नांना जगभरातील सरकारे आणि संघटनांकडून 5,200 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत.भारतात मागील 15 वर्षापेक्षा जास्त काळापासून विविध सामाजिक कार्यात सक्रिय योगदान दिले आहे.60 व्या वर्धापन दिनानिमित्त,चर्च ऑफ गॉड जागतिक समर्थक उपक्रम राबवत आले.ज्या मध्ये "प्लास्टिक फूट प्रिंट पुसून टाका"आणि "फॉरेस्ट ऑफ होप" तसेच असुरक्षित समुदायांना "होल्ड होप " मोहीम यांचा समावेश आहे या मोहिमेला सर्व स्तरांतून प्रशंसा मिळाली व पारितोषिके देऊन संस्थेचा सन्मान करण्यात आला.ही संस्था, चर्च उदगीर येथे ही मातांचा प्रेमाद्वारे 2015 पासून कार्यरत आहे व उदगीर येथ स्वच्छता अभियान,रक्तदान,आपत्तीग्रस्तान मदत केली आहे.व आज च्या या कार्यक्रमाला उदगीर येथील नेते मा.जवाहरलालजी कांबळे यांच्या हस्ते बोरगाव येथील आपत्तीग्रस्त कुटुंबांना अन्न धान्य वितरण करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष लिओ ,सुनीता विपुल भातांब्रेकर,सुनील म्हेत्रे,गवळण म्हेत्रे,अंकुश मोरे,मीना मोरे, श्वेत जामने,मुकेश जाधव,महानंदा सूर्यवंशी, सत्यकला जाधव,अनिकेत जाधव,संदेश कोंगे,राजकुमार सूर्यवंशी,मोहिनी कोंगे,दीपाली कोंगे,प्रवीण मोरे, यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले
बोरगाव येथील पत्रकार श्री रामभाऊ जाधव यांचेही या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले


Post a Comment
0 Comments