Type Here to Get Search Results !

उदगीरमध्ये शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


 उदगीरमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

उदगीर ( अरुण उजेडकर ):

उदगीर शहर पोलीस स्टेशन व उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ मे २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते आणि एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात, हा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.

शिबिरासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, तज्ञ डॉक्टरांची टीम आणि सुरक्षित रक्तसंकलनाची व्यवस्था करण्यात आली असून, रक्तदात्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे.

👉 नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन उदगीर पोलीस प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments