Type Here to Get Search Results !

"स्व-जनगणने”द्वारे सहभागी होण्याचे तहसीलदार उदगीर यांचे आवाहन*



 

*दि. 04/05/2026*

 उदगीर(अरुण उजेडकर) * जनगणना 2027 पूर्वतयारी – घर यादी टप्प्यास 16 मे पासून सुरुवात, “स्व-जनगणने”द्वारे सहभागी होण्याचे तहसीलदार उदगीर यांचे आवाहन*

*उदगीर, दि. 4:* देशाच्या महत्त्वाकांक्षी जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यातील *“घर यादी व घर गणना”* कामकाजास *दि. 16 मे ते 14 जून 2026* या कालावधीत उदगीर तालुक्यात सुरुवात होत आहे. या अनुषंगाने नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण नुकतेच उत्साहात संपन्न झाले. प्रशिक्षणात कामकाजाची सखोल माहिती, प्रभावी प्रसिद्धी व व्यापक जनजागृती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जनगणनेचा *दुसरा टप्पा – लोकसंख्या गणना – फेब्रुवारी 2027* मध्ये पार पडणार आहे.

*“महाराष्ट्रात स्वागत” – 1 ते 15 मे विशेष जनजागृती मोहीम*  

शासनाच्या निर्देशानुसार दि. 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत *“महाराष्ट्रात स्वागत”* या उपक्रमांतर्गत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याद्वारे विविध पारंपरिक व सोशल मीडिया माध्यमातून जनगणनेचे महत्त्व प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

*“स्व-जनगणना” – नागरिकांसाठी सुवर्णसंधी*  

या वर्षीपासून शासनाने नागरिकांसाठी *“स्व-जनगणना (Self Enumeration)”* ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन स्वतःची व कुटुंबाची माहिती मोबाईल/कॉम्प्युटरद्वारे अचूक भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

*स्व-जनगणनेचे फायदे:*  

1. वेळेची बचत– प्रगणकाच्या भेटीची वाट पाहण्याची गरज नाही.  

2. पारदर्शकता – माहिती तुम्ही स्वतः भरत असल्याने अचूकता व गोपनीयता.  

3. सुलभता – 24x7 ऑनलाईन सुविधा उपलब्ध.  

स्व-जनगणना पूर्ण केल्यानंतर मिळणारा *SE ID (Self Enumeration ID)* जपून ठेवावा व प्रगणक भेटीस आल्यावर त्यांना दाखवावा.

34 प्रश्न – अचूक उत्तरे द्या, देश घडवा जनगणनेत घर, सुविधा, शिक्षण, व्यवसाय इत्यादींबाबत *एकूण 34 प्रश्न* विचारले जाणार आहेत. नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता खरी व अचूक माहिती द्यावी. हीच माहिती पुढील 10 वर्षांसाठी शासनाच्या धोरणांचा, योजनांचा व विकासाचा पाया ठरणार आहे.

 “जनगणना हे केवळ शासकीय काम नसून राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभाग नोंदवून उदगीर तालुक्याला 100% अचूक जनगणनेचा मान मिळवून द्यावा. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून हा उपक्रम यशस्वी करावा. असे आवाहन चार्ज अधिकारी तथा तहसीलदार, उदगीर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments