Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र जन एकता संघटनेचा उपोषणकर्त्यास पाठिंबा




 उदगीर ( अरुण  उजेडकर)

उदगीर उपविभागीय कार्यालय येथे आमरण उपोषण करते यांना पाठिंबा देऊन,आज उपविभागीय अधिकारी यांना महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने निवेदन,संबंधित विभागाचे  उपोषणकर्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज उपोषण करते यांना पाठिंबा देऊन उपविभागीय अधिकारी यांना महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली की हामिद शेख यांचे प्रमुख मागण्या आहेत की,प्रमुख मागण्या

१) डिग्रस मुस्लिम स्मशानभूमीच्या जागेतील अतिक्रमण हटवा व अतिक्रमण करणाऱ्या वर गुन्हे दाखल करा

२)मनोज गॅस एजन्सी बेकायदेशीर गोडाऊन व महाराष्ट्रात उदगीर मध्ये टंचाई असताना कमालनगर मध्ये अनाधिकृत ठिकाणी गॅस जमा करून विक्री करत आहेत. त्यांच्यावर कार्यवाही करणे.

३) नगरपरिषद उदगीर बॅनर कर घोटाळा त्यावर कारवाई करणे.

अशा प्रमुख तीन मागण्या घेऊन पुराव्या निश्चित तक्रार दाखल करून  त्यावर कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनाने दखल घ्यावे यासाठी आमरण उपोषणास बसले असता संबंधित विभाग झोपल्याचे सोंग करत असल्याचे दिसून येत आहे आतापर्यंत तिव्र उन्हाचा तडाका असताना उपोषणकर्त्यास भेट देऊन त्यांची कसलीही समस्या जाणून न घेता झोपेचे सोंग करत असल्याचे संबंधित प्रशासन दिसत आहे, या सर्व मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने लातूर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे उपोषण करणार आहोत असे 

निवेदन देते वेळी जिल्हा कार्यांध्यक्ष इस्माईल मनियार तालुका अध्यक्ष सिकंदर शेख यानी म्हटले आहेत..

Post a Comment

0 Comments