Type Here to Get Search Results !

उदगीर शहरातील २०११ पूर्वीची शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करा - प्रदीप जोंधळे


 उदगीर शहरातील  २०११ पूर्वीची शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करा - प्रदीप जोंधळे


उदगीर ( अरुण उजेडकर  ) उदगीर शहरातील  २०११ पूर्वीची संजय नगर, मुसा नगर,  गोविंद नगर, वडार गल्ली, धनगर सोसायटी व फुले नगर, गांधी नगर व अण्णाभाऊ साठे नगर या वस्तीतील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यात यावे अशी मागणी एआयएमआयएमचे कार्यकर्ते प्रदीपजोंधळे यांनी एका निवेदनाद्वारे उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे आहे.

     शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच अनुषंगाने उदगीर शहरातील  संजय नगर, मुसा नगर,  गोविंद नगर, वडार गल्ली, धनगर सोसायटी व फुले नगर, गांधी नगर व अण्णाभाऊ साठे नगर या भागातील शासकीय जमिनीवरील  निवासी अतिक्रमणे ८० च्या दशकात झाली आहेत . या भागात प्रामुख्याने  अनुसूचित जाती जमाती व भटके विमुक्त लोक वस्ती करून राहत आहेत . या भागात नगर परिषदेने रस्ते, नाल्या, पाणी व वीज आदी मुलभूत सुविधा पुरविल्या आहेत . मात्र अतिक्रमणे नियमित नसल्या कारणाने त्यांना शासकीय घरकुले व इतर योजनांचा लाभ मिळाला नाही . 

यामुळे उदगीर शहरातील अतिक्रमणे नियमित करन शेकडो कुटुंबांना मोठा  दिलासा देण्यात यावा तसेच प्रधानमंत्री आवास योजना किंवा रमाई आवास योजनेचे घरकुल मंजुर करून या भागातील नागरिकांच्या निवाऱ्याची  सोय करण्यात यावी .

Post a Comment

0 Comments