अनिरुद्ध शिवाजीराव गुरुडे यांचे नगरसेवकपद बेकायदेशीर, रद्द करण्याची मागणी
उदगीर/ ( अरुण उजेडकर)
उदगीर नगर पालिका निवडणूक पारपडल्या नंतर तज्ज्ञ स्वीकृत नगरसेवक सदस्य निवडण्याची प्रक्रिया पारपडली. ही निवड प्रक्रिया सुरूवातीपासूनच चुकीच्या आधारे घेण्यात आली. ज्याचा फायदा अनिरुद्ध गुरुडे यांना झाला असून त्यांची निवड कायद्याच्या चौकटीत बसत नाही. ते स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी दिलेली सर्व माहिती चुकीची, खोटी आहे. ते पालिकेत गुत्तेदारी करण्याच्या उद्देशाने आले असल्यामुळे त्यांचे स्वीकृत नगरसेवक पद तात्काळ रद्द करण्याची याचिका जिल्हाधिकारी यांच्याकडे आदर्श पिंपरे यांनी केली आहे.
उदगीर नगर परिषदेत स्वीकृत सदस्य निवडी प्रक्रीया चुकीच्या पध्दतीने झाली असून अनिरुद्ध शिवाजीराव गुरुडे हे नगर पालिका निवडणुक प्रक्रीत मतदार नसतानाही चुकीचे प्रमाण नोंदवून उमेदवारी दाखल केली. ज्या क्षेत्रातून त्यांची निवड करण्यात आली आहे. ते म्हणजे सामाजीक प्रवर्गातून गुरुडे यांनी आपण दि. 17- 10- 2019 पासून श्रध्दा सबुरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, उदगीर या संस्थेचे उपाध्यक्ष असल्याची माहिती दिली. मात्र त्यांची हि नियुक्ती कायदेशीर नसल्याचे धर्मादाय संस्थेच्या कायद्यानुसार प्रमाणित होते. शिवाय अनिरुद्ध गुरुडे यांची पत्नी दिक्षा गुरुडे यांच्या नावे उदयगिरी कन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपर्स च्या प्रोप्रायटर असून या कन्स्ट्रक्शन्सच्या कामे उदगीर नगर पालिकेत मोठ्याप्रमाणात सुरू आहेत. अशा परिस्थितीत त्यांची निवड अयोग्य आहे.
वरिल सर्व विषयाकडे पाहिल्यास ते स्वीकृत नगरसेवक पदी राहण्यास आपात्र आहेत. त्यामुळे अनिरुद्ध गुरुडे यांना तात्काळ पदमुक्त करावी यासाठी उदगीर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आदर्श गौतम पिंपरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी याचिका केली आहे.







Post a Comment
0 Comments