लातूर जिल्ह्यातील औसा येथून एक महत्त्वाची आणि चर्चेची बातमी समोर आली आहे. न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली.
औसा (जि. लातूर)/ अरुण उजेडकर
दिवाणी न्यायालय औसा यांनी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात लातूरचे जिल्हाधिकारी आणि औसा येथील तहसीलदार यांच्यावर प्रत्येकी ₹३ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून अतिक्रमणाच्या नावाखाली नागरिकाला घरातून बेदखल करणे व घर पाडण्याची बेकायदेशीर कारवाई केल्याचे न्यायालयाने गंभीरपणे नोंदवले.
ही कारवाई दिवाणी किरकोळ अर्ज क्रमांक 03/2024
कविता बालाजी कटके विरुद्ध वर्षा ठाकूर घुगे (जिल्हाधिकारी लातूर) व भरत सूर्यवंशी (तत्कालीन तहसीलदार औसा) या प्रकरणात करण्यात आली.
न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, संबंधित प्रशासनाने वरिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून मनमानी पद्धतीने कारवाई केली. त्यामुळे अर्जदाराला अन्यायकारक पद्धतीने घरातून बेदखल करण्यात आले व घर पाडण्यात आले.
यावर सुनावणी करताना न्यायालयाने दिनांक १७ मार्च २०२६ रोजी निर्णय देत संबंधित अधिकाऱ्यांवर व्यक्तिशः दंड ठोठावला. तसेच, या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी
मंत्रालय, मुंबई येथील सचिव
विभागीय आयुक्त, महसूल छत्रपती संभाजीनगर
यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात अर्जदाराची बाजू अॅड. जीवन एन. करडे यांनी प्रभावीपणे मांडली, तर त्यांना अॅड. महेश कुमार गाडेकर आणि अॅड. एन. बी. जाधव यांनी सहकार्य केले.


Post a Comment
0 Comments