Type Here to Get Search Results !

डॉ. दीपक सोमवंशी यांना मत म्हणजे विकासाला मत - आ. संजय बनसोडे


 

उदगीर (प्रतिनिधी ) निडेबन जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष युतीचे अधिकृत उमेदवार डॉ. दीपक सोमवंशी यांना मत म्हणजे विकासाला मत आहे. एक अत्यंत सोज्वळ आणि उच्चविद्या विभूषित उमेदवार आहेत. समाजसेवेची आवड आणि सवय आहे. त्यामुळे ते राजकारणात आले तर राजकारणाचा फायदा समाजकारणासाठीच करून देतील. असा मला विश्वास आहे, असे विचार आ. संजय भाऊ बनसोडे यांनी मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केले. 

गेल्या पन्नास वर्षाचा विकासाचा बॅकलॉग उदगीर विधानसभेचा गेल्या सहा वर्षात भरून काढण्यात आला आहे. खूप मोठा बॅकलॉग असल्यामुळे विकासाला गती घेऊन हे काम करावे लागले. जनतेने देखील मला मोठ्या प्रमाणात प्रेम दिले. मराठवाड्यात उल्लेखनीय अशा पद्धतीचे मताधिक्य देऊन मला दुसऱ्यांदा आमदार केले. जनता ज्या पद्धतीने माझ्यावर प्रेम करते, त्याच पद्धतीने डॉ. दीपक सोमवंशी यांच्यावरही विश्वास ठेवावा. आपल्या जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करून विकासाची उर्वरित राहिलेली कामे ते निश्चितपणे मोठ्या उत्साहाने आणि पारदर्शकपणे करतील असा मला विश्वास आहे. देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीचे सरकार आहे, राज्यातही महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेत ही महायुती जर आली तर निश्चितच विकासाला गती मिळू शकते. असा मला विश्वास आहे असेही आ. संजय बनसोडे म्हणाले. मला पूर्ण विश्वास आहे की, जनता आपला प्रतिनिधी निवडत असताना योग्य व्यक्तीची निवड करेल. आपले प्रत्येक मत विकासाला दिशा देणारे ठरू शकते. जर चुकीचा माणूस निवडून दिला तर पाच वर्ष विकासापासून दूर राहण्याचे दुर्दैव आपल्या नशीब येऊ शकते. निडेबन जिल्हा परिषद हद्दीतील मतदार सुजाण आहेत. ते विकासाला मतदान करतील. एका समाजसेवी प्रवृत्तीच्या माणसाला प्रचंड मताधिक्याने निवडून देतील असा मला पूर्ण विश्वास आहे. डॉ. सोमवंशी यांना मतदान म्हणजे विकासाला मतदान आहे, अशा शब्दात आ. संजय बनसोडे यांनी मतदारांना आवाहन केले की, दीपक सोमवंशी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, आणि विकासाची कामे माझ्याकडून करून घ्या. मी त्यांचा जामीनदार म्हणून काम करेन.

Post a Comment

0 Comments