Type Here to Get Search Results !

मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात निडेबन येथे दगडफेक, पोलीस जखमी



 मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात निडेबन येथे दगडफेक, पोलीस जखमी


उदगीर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील

निडेबन जिल्हा परिषद गटातील मौजे निडेबन गावातील बूथ क्रमांक 16, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निडेबन (पूर्व बाजू) या ठिकाणी मतदानाची वेळ संपल्यानंतर, मतदान ची वेळ संपण्यापूर्वी उपस्थित असलेल्या मतदानासाठी थांबलेल्या जवळपास 30 ते 35 मतदारांच्या रांग लावून त्यांना चिठ्ठ्या वाटप करताना, शेवटच्या टप्प्यात तणाव वाढल्याने पोलीस बंदोबस्त वाढला होता. गावातील काही मंडळी गोंधळ घालण्याच्या तयारीत असल्याचे पाहून पोलीस आक्रमक झाले होते. याच दरम्यान कोणीतरी एका पोलीस कर्मचाऱ्याला दगड मारून जखमी केले. या बंदोबस्तासाठी वर्धा येथून आलेले मंगेश सोनोणे हे कर्मचारी जखमी झाले. त्यांच्या डोक्यावर दगड लागल्यामुळे रक्त निघत होते. वेळीच जखमेवर हळद व औषध लावून त्यांना आराम करायला सांगितले. मात्र काही गुंड प्रवृत्तीचे नागरिक गोंधळ घालण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत होते. पोलिसांची संख्या मोठी असल्यामुळे अनर्थ टळला, दगड मारणारा मात्र फरार झाला. ग्रामीण पोलीस मात्र हा तमाशा पाहत होते, दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या पोलिसांनी जीवापाड प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments