उदगीर (प्रतिनिधी) उदगीर विधानसभा मतदारसंघाचा सध्या सर्वांची विकास होतो आहे. विकास पुरुष तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार संजय भाऊ बनसोडे यांची विकासाची दूरदृष्टी हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून मी निडेबन जिल्हा परिषद सर्कलचा विकास करीन. असे आश्वासन भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार डॉ. दीपक संग्राम सोमवंशी यांनी दिले आहे.
निडेबन येथील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांना उद्देशून बोलताना डॉ. दीपक सोमवंशी म्हणाले की, माझ्या गावातून मला मोठ्या प्रमाणात सहकार्य आणि पाठिंबा मिळत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. एक उच्चविद्या विभूषित उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे नेते आ. संजय भाऊ बनसोडे यांनी आपल्याला उमेदवारी देऊन समाजसेवेसाठी प्रेरणा दिली आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने विकास कामे करून एक नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहीन. निडेबन जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व गावांचा विकास करत असतानाच नागरिकांना नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत, शासनाच्या लोककल्याणकारी योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यासाठी विशेष प्रयत्न करीन, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी निडेबन गावाचे माजी सरपंच सुनील भाऊ सोमवंशी, ग्रामपंचायत सदस्य संदीप अनंतवाळ, दशरथ शिंदे, शशिकांत सोमवंशी, मारुती सोमवंशी, श्रीरंग वाघमारे, गौतम सोमवंशी, धम्म सागर सोमवंशी, मनोज भाऊ कपाळे, जोगेंद्र सोमवंशी, शिवराज अनंतवाळ, भीम सोमवंशी, शेखर अनंतवाळ, आशिष सूर्यवंशी, अभिनव वानखेडे, खंडू सोमवंशी, गणेश कांबळे, नरसिंग सोमवंशी, रामदास सूर्यवंशी, महादेव हरणे, बाबू चंद्रकांत अनंतवाळ यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्या गावाची शान असलेल्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला. तसेच प्रत्येक नागरिकांनी आपण स्वतः उमेदवार आहोत, असे समजून प्रचार यंत्रणेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. असेही आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. गावकऱ्यांचा हा उत्साह पाहून भारावलेल्या स्थितीत जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार डॉ. दीपक सोमवंशी यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, उदगीर तालुकाच नव्हे तर सीमा भागातील जनतेने देखील आतापर्यंत माझ्यावर प्रचंड प्रेम केले आहे. निडेबन जिल्हा परिषद सर्कल तर माझे घर असल्यासारखा आहे. त्यामुळे घरच्यांनी इतक्या उत्साहाने मला पाठिंबा दिला आहे, आणि माझ्या प्रचारामध्ये सहभाग नोंदवला आहे. या गोष्टीचा मला प्रचंड आनंद होत आहे. या जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या दोन पंचायत समिती गणातून अत्यंत कर्तबगार आणि ज्यांनी यापूर्वी प्रत्यक्ष लोककल्याणकारी योजना आपल्या मतदार संघात राबवल्या आहेत, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून प्रकाश राठोड यांनी अत्यंत उत्कृष्ट कार्य केलेले आहे. त्याच पद्धतीने मनोज भाऊ चिखले यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून चांगले काम केलेले आहे. त्यांच्या या कामाची पावती म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रकाश राठोड यांच्या सुविद्य पत्नी यांना शिरोळ जानापुर गणातून तर मनोज भाऊ चिखले यांच्या मातोश्रींना निडेबन गणातून उमेदवारी दिलेली आहे. या दोन्हीही सक्रिय आणि कर्तबगार सहकार्यासह आम्हाला घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करावे. असे आवाहनही याप्रसंगी डॉ. दीपक सोमवंशी यांनी केले.
या प्रचार सभेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर बोईनवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश गायकवाड यांनी केले.


Post a Comment
0 Comments