उदगीर (प्रतिनिधी) उदगीर येथील जनता पोलीस टाइम्स युट्युबचे संपादक श्रीधर सावळे यांना त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा दर्पण रत्न पुरस्कार, जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे श्रीधर सावळे यांचा सन्मान वाढला आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य पत्रकारांमध्ये त्यांची गणना झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. श्रीधर सावळे हे अत्यंत संयमी आणि शांत प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांचा मित्रवर्ग फार मोठा आहे. शासकीय, प्रशासकीय क्षेत्रातील बातम्या लिहिण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. विशेषत: भ्रष्टाचार विरोधामध्ये त्यांनी आजपर्यंत केलेले काम हे उल्लेखनीय आहे.
श्रीधर सावळे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या मित्र परिवारातील एल पी उगिले, सुरेश बोडके, यांच्यासह विधीज्ञ जयवर्धन भाले, खाजाभाई शेख, डॉ. भातंबरे विपुल, नगरसेवक राजकुमार भालेराव, राजू गायकवाड, अरुण उजेडकर इत्यादींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments