तोंडचिर ग्रामपंचायतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘विरंगुळा कक्ष’ सुरु — सेवाभावी उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत
उदगीर तोंडचिर (प्रतिनिधी)
आज तोंडचिर ग्रामपंचायतीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कक्षाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावून या उपक्रमाचे स्वागत केले.
ग्रामपंचायतीने गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हा कक्ष तयार करताना विविध करमणुकीची साधने, वाचनासाठी साहित्य, विश्रांतीची सोय, पिण्याच्या पाण्याची सुविधा अशा अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.
तसेच ग्रामपंचायतीने ज्येष्ठ नागरिकांची महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प व्यक्त केला असून या उपक्रमामुळे गावातील वयोवृद्धांच्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेतली जाईल, असा विश्वास सरपंच व सदस्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक कार्यकर्ते, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत ग्रामपंचायतीचे आभार मानले.
---

Post a Comment
0 Comments