जळकोट तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली असून, तिरू नदीमधील पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्यामुळे मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या दरम्यान घडली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , जळकोट तालुक्यातील मर सांगवी येथील कौशल्या अजय वाघमारे वय ३५ व रुक्मिणी अजय वाघमारे वय १४ या दोघी मायलेकी मरसांगवी येथीलच मरीबा वाघमारे यांच्या शेतामधील कापूस वेचण्यासाठी मजुरीने जात होत्या . कापूस वेचण्यासाठी चे शेत नदीपलीकडे होते . शेताकडे जात असताना नदी मध्ये पाणी कमीच होते . मात्र तिरू नदीमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे या दोघीही पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्या व दुर्दैवी या दोघींचाही मृत्यू झाला .
सदरील मायलेकी वाहून गेल्याची माहिती मिळताच गावातील काही जन नदीपात्रात धावले व मायलेकीला काढण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला होता . मायलेकीचा एकाच वेळी दुर्दैव मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे .

Post a Comment
0 Comments