उदगीर (प्रतिनिधी)
आद्य क्रांतिकारक तथा "जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी" अशा पद्धतीचा क्रांतिकारी विचार ज्यांनी अंगीकारला आणि उपेक्षितांच्या हक्क आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रणसंग्राम लढवला, अशा वस्ताद लहुजी साळवे यांचा क्रांतिकारी इतिहास नव्या पिढीच्या समोर कायम प्रेरणा देणारा ठरणार आहे. तो इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा, यासाठी वस्ताद लहुजी साळवे यांचा जयंती महोत्सव समारोह मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणे गरजेचे आहे. असे विचार वस्ताद लहुजी साळवे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष युवानेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या ध्वजारोहण प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी मातंग समाजातील धडाडीचे नेते बन्सीलालजी कांबळे, पप्पू गायकवाड, बालाजी गडकर, संग्राम अंधारे, दत्ता गडकरी, रंजीत कांबळे, अजित कांबळे, अरविंद शिंदे, हनुमंत जाधव, करण अंधारे, रामेश्वर शिंदे, प्रीतम जाधव, नेताजी कांबळे, अरुण शिंदे, सुलोचनाताई जाधव, रेणुका उपाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना स्वप्निल अण्णा जाधव म्हणाले की, समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकसंघ राहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या गटातटाचे राजकारण न करता समाजकारण करण्यासाठी समाजातील जेष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन करणे आणि नव्या पिढीला आशीर्वाद देणे गरजेचे आहे. जेणेकरून तरुण एकत्र येतील, आणि जो आदर्श आहे, तो जपण्याचा प्रयत्न करतील. अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
सकाळी ध्वजारोहणानंतर मोठ्या उत्साह शहरातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणूकही काढण्यात आली. स्वप्निल अण्णा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी समाजातील मान्यवर नेत्यांनी या मिरवणुकीचेही स्वागत केले. या मिरवणुकीमध्ये समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Post a Comment
0 Comments