Type Here to Get Search Results !

रंगकर्मी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचा विराळ येथे गावातील मुलींच्या जन्माचा शुभारंभ मुलीच्या नावे 5000 डिपॉझिट करून जन्माचे स्वागत



  राष्ट्रमाता जिजाऊ – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले  विराळची लाडकी लेक मुदत ठेव उपक्रमाचा ’चा शुभारंंभ

उदगीर  प्रतिनिधी: सतत सामाजिक , शैक्षणिक व सांस्कृतीक कार्यात आग्रेसर असलेल्या 

रंगकर्मी  प्रतिष्ठान उदगीरच्या वतीने  विराळ  ता जळकोट येथिल गावात  जन्मलेल्या मुलींच्या नावे 5000 डिपाॅझिट करुन मुंलीचा  जन्माचे  स्वागत "राष्ट्रमाता जिजाऊ ज्ञानज्योती साविञीबाई फुले विराळची लाडकी लेक" उपक्रमाचा  शूभारंभ दि.२७ ऑक्टोंबर रोजी सोमवारी .विराळ येथील श्री समर्थ धोंडूतात्या मंदिर येथे  

प्रगती अनिता प्रल्हाद सोनटक्के , स्नेशा विशाल सोनटक्के  ,रेवा प्रज्ञा मुकेश वाघमारे या तीन नवजात  मुलींच्या आई वडिलांना   चेक व  साडीचा आहेर करुन  जन्माचे स्वागत करुन  शुभारंभ  करण्यात  आला . 

 यावेळी जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार ज्ञानोबा जाधव नर्सिंग सोनटक्के प्राचार्य संजय येरनाळे लक्ष्मणराव एकलारे शिवशंभ सोनटक्के तानाजी सोनटक्के, दिगंबर सोनटक्के, अंकुश  मद्रे, पोलीस काॅनेस्टेबल  महेश मुसळे, अंबादास जाधव बळीराम सोनटक्के संतोष पवार मुख्याध्यापक तातेराव वाघमारे रंगकर्मीचे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड, सचिव ज्योती  मद्देवाड कवडेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी रामदास केदार सचिन शिवशेट्टे , लक्ष्मण बेंबडे ,प्रल्हाद येवरीकर ,हणमंत केंद्रे नागनाथ गुट्टे संदीप निडवदे शरद पवार धोंडीबा श्रीमंगले,सुनिल वाघमारे , रमेश मद्देवाड आदी उपस्थित होते

कार्यक्रमाचे सुञसंचलन  शिवशंकर सोनटक्के यांनी केले तर आभार  निलकंठ  सोनटक्के यांनी मानले 

   सामाजिक आर्थिक सांस्कृतीक कारणामुळे समाजातील मुलींचे घटणारे प्रमाण थांबावे व मुलीचे शिक्षण ,आरोग्य व आभिमान यासाठीमदत व्हावी  तसेच तिच्या शिक्षण, उच्च शिक्षण वा स्वावलंबनासाठी उपयोगात आणली जाणार आहे. रंगकर्मी प्रतिष्ठानच्या या अनोख्या पावलामुळे समाजात “कन्येचा जन्म म्हणजे अभिमानाचा क्षण” हा सकारात्मक संदेश जाणार आहे.लाडकी लेक मुदत ठेव योजना – कन्येच्या जन्माचा आनंद आता सन्मान, शिक्षण आणि सुरक्षिततेच्या रूपाने महत्वाचे ठरणार आहे,

बेटी बचाओ  बेटी पढाओ  साठी रंगकर्मीचे एक पाऊल ...



“राष्ट्रमाता जिजाऊ आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाला स्त्रीशिक्षण आणि स्त्री सन्मानाचा आदर्श घालुन दिला.  कन्येचा   जन्म म्हणजे अभिमान व गौरवाचा क्षण  असुन मुलीच्या जन्माचा सन्मान आर्थिक जबाबदारीतून करायचा ठरवला,” आसुन समाजात मुलीला जन्माला आल्यावर तिचे स्वागत आनंदात व्हावे.बेटी बचाओ,बेटी ला प्रत्यक्ष कृतीरूप कन्येच्या जन्माचा सन्मान आणि आर्थिक सुरक्षिततेचा संगम साधून गावचे काही तरी देणे लागतो या सामाजीक  जानिवेतून   गावासाठी  हे कार्य करणार  आहोत आसे प्रा.बिभिषण मद्देवाड व प्रा.ज्योती मद्देवाड  यांनी   सांगितले.

Post a Comment

0 Comments