Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या निवेदनाचा दणका – उदगीर नगरपरिषद मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी तयारीला



 उदगीर प्रतिनिधी

उदगीर शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने नुकतेच मुख्याधिकारी साहेब, उदगीर नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचे थवे रस्त्यावर फिरत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. नागरिकांमध्ये यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

म्हणूनच तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला होता.

या निवेदनाचा दणका बसताच उदगीर नगर परिषदेने त्वरित कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. संघटनेच्या या पुढाकारामुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या निवेदनावर तालुका अध्यक्ष सिकंदर शेख शहर अध्यक्ष नोमान सय्यद,शहर उपाध्यक्ष इस्माईल मनियार वजिर सय्यद अभिजीत थोरे  उतम  बिरादार, चंद्रकांत कस्तुरे  आदींसह यांच्या सह्या आहेत...!

Post a Comment

0 Comments