उदगीर येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश
उदगीर ( प्रतिनिधी ) उदगीर येथील युवक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उदगीर शहराध्यक्ष जानीभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष शफी हाशमी यांच्या मार्गदर्शनाखाली अबरार पटेल, साद मुंजेवार, खदीर शेख, हैदर पटेल, अरसलान शेख व अबुझेद चौधरी आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला . या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष अभिजीत औटे, राकाँपा सामाजिक न्याय विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उदगीर शहराध्यक्ष अजम पटेल, सोनू हाशमी, राजकुमार गंडारे, सतीश चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उदगीर शहराध्यक्षा मधुमती कनशेट्टे, शहर कार्याध्यक्षा वैशाली कांबळेराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उदगीर शहराध्यक्ष अजम पटेल, सोनू हाशमी, राजकुमार गंडारे, सतीश कांबळे, हिफजू रहेमान हाशमी, अश्रफ बाबा देशमुख, शहबाज शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment
0 Comments