Type Here to Get Search Results !

मानव आणि प्राण्यातील साम्य- भेदाची उकल करणारी साहित्यकृती म्हणजे पशु चिकित्सा शास्त्र होय- डॉ. अनिल भिकाने.

मानव आणि प्राण्यातील साम्य-भेदाची उकल करणारी साहित्य कृती म्हणजे पशुचिकित्सा शास्त्र होय. --  डॉ.अनिल भिकाने.

 मानव आणि प्राण्याची शरीर रचना, अंतर्गत इंद्रिये यांच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी साम्य आहे. तर काही ठिकाणी वेगळेपण आहे. काही प्राणी मांसाहारी असले तरी गाय म्हैस शेळी असे पाळीव प्राणी मात्र पूर्णपणे शाकाहारीच आहेत. त्यांची दणकट शरीरयष्टी, बळाचा फायदा मानवास होतो. यामुळे मानव आणि प्राणी यांचे संबंध एकमेकावलंबी आहे. प्राण्यांचे संगोपन मानव करतो तर श्रमबल, दूध, मांस, अंडी, कातडी, हाडे यांच्या माध्यमातून प्राणी मानवास उपयोगी पडतात. या सर्वांबरोबरच मानव आणि प्राण्यातील साम्य-भेदाची उकल करणारी साहित्य कृती म्हणजे हँडबुक फॉर व्हेटर्नरी क्लिनिशियन्स अर्थात पशुचिकित्सा शास्त्र होय असे मत प्रसिद्ध पशुचिकित्सा शास्त्र तज्ञ डॉ. अनिल भीकाने यांनी व्यक्त केले.

      दशरथ शिंदे यांचे अध्यक्षते खाली वाचक संवाद चे 344 वे पुष्प संपन्न झाले. चला कवितेच्या बनात अंतर्गत गेल्या चौदा वर्षा पासून अखंडितपणे चालू असलेल्या या कार्यक्रमात डॉ. अनिल भिकाने व डॉ. कविटकर लिखित हँडबुक फॉर व्हेटर्नरी क्लिनिशियन्स या साहित्यकृतीवर संवाद साधताना डॉ.अनिल भिकाने म्हणाले की या साहित्यकृतीच्या सात आवृत्ती निघाल्या असून देश विदेशात 35000 पेक्षा जास्त प्रति विकल्या गेलेल्या आहेत.  ही साहित्यकृती पशुवैद्यक महाविद्यालयात तसेच पशुचिकित्सालयात अत्यंत उपयोगी पडणारी असून या साहित्यकृतीमध्ये प्राण्यांची राहण्याची, जगण्याची आणि त्यांच्या जीवनाची कहाणी अत्यंत सुंदरपणे मांडण्यात आलेली आहे. मानव आणि प्राणी संबधाचे फायदे- तोटे सांगत प्राण्यांना होणारे आजार त्यापासून त्यांचे करावयाचे संरक्षण, घ्यावयाची काळजी या संदर्भाने अत्यंत सुंदर असे विवेचन केले. रवंत करणारे प्राणी तंतुमय पदार्थ खाऊन दर्जेदार दुधाचे निर्मिती करतात प्राण्यांना चव कळते झोप येते त्यांना स्वप्न पडतात त्यांची दृष्टी छान असते त्यांना आवाज कळतो आणि त्यांना भावनाही असतात हे सांगतानाच श्वानदोष आणि प्रतिबंधक लस अशा अनेक मानव उपयोगी गोष्टी यावेळी त्यांनी अत्यंत सुंदरपणे सांगितल्या.

       यावेळी उपस्थितामध्ये अत्यंत सुंदर चर्चा झाल्या. यानंतर दशरथ शिंदे यांनीअध्यक्षिय भाषण केले. या कार्यक्रमास अनेक साहित्यिक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. म. ई. तंगावार यांनी केले, संवादकांचा परिचय तुळसीदास बिरादार यांनी करून दिला तर आभार  मुरलीधर जाधव यांनी मानले.

 

Post a Comment

0 Comments