उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील माजी सरपंच तथा वाढवणा जिल्हा परिषद सर्कलचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे गोरगरिबांचे हित जपणारे आणि विकासाची जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. हंडरगुळी सारख्या मोठ्या गावात प्रचंड पाणीटंचाई असताना, काँग्रेस पक्षाचे नेते कल्याण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी योजना खेचून आणून हाळी आणि हंडरगुळी या दोन्ही गावातील पाणीटंचाई आजघडीला सोडवली आहे. लोककल्याणकारी योजना गाव पातळीवर राबवण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. सरपंच असताना त्यांनी शासकीय योजना तर राबवल्याच राबवल्या, त्यासोबतच गोरगरिबांच्या अडीअडचणीला धावून जाऊन अनेकांचे प्रश्न मिटवले आहेत. गोरगरिबांच्या अश्रू पुसणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे वाढवणा परिसरातील लोक पाहतात.
त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती आहे. स्थानिकचे उमेदवार म्हणून प्रत्येक जण त्यांना जवळून ओळखतो. आपल्या अडीअडचणी सोडवणारा माणूस म्हणून त्यांना प्रेमाने बोलतो. त्यांच्या प्रचारामध्ये सर्वच लोक सहभागी होत आहेत. हे मी प्रत्यक्ष अनुभवते, असे विचार वाढवणा गावच्या सरपंच तथा वाढवला पंचायत समितीच्या उमेदवार असलेल्या सौ. सविता दत्तात्रय बामणे यांनी व्यक्त केल्या आहेत.
या संदर्भात बोलताना सविता बामणे म्हणाल्या की, वाढवणा शहरातील सर्व अडचणी आणि नागरी सुविधा पुरवण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणात लोक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्या पक्षाची कार्यकर्ता असल्यामुळे मला खात्री आहे, लोक खोटे आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भूलथापांना बळी न पडता काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी करतील. याची मला खात्री आहे. इतरही काही पक्ष आपली औकात आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना जनता भीक घालणार नाही याचा मला विश्वास आहे. असे विचार सौ. सविता दत्तात्रय बामणे यांनी व्यक्त केले आहेत.

Post a Comment
0 Comments