Type Here to Get Search Results !

१मार्च रोजी उदगीरात शिक्षक साहित्य संमेलन..

 उदगीर प्रतिनिधी / अरुण उजेडकर 
 अध्यक्षपदी प्राचार्य डाॅ राजकुमार मस्के, व माजी मंञी आ संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन

रंगकर्मी प्रतिष्ठानचे आयोजन

उदगीर : रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान, उदगीर यांच्या वतीने उदगीरात दि. १मार्च  २०२६ रविवार रोजी उदगीरात लिंकन इंटरनॅशनल स्कूल ,निडेबन ग्राम पंचायत पाठीमागे  ,उदगीर येथे शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन माजी मंञी आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे.   संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्घ विचारवंत  प्राचार्य डाॅ राजकुमार मस्के हे असणार आहेत यावेळी रुबाब टिडीएम,बबन चिञपट फेम अभिनेञी व नृत्यांगना शितल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर समेलनाचे स्वागत अध्यक्ष दिलीपकुमार गायकवाड हे असणार आहेत

   या संमेलनात उद्घाटन सोहळा,  कविसंमेलन,परिसंवाद, पुरस्कारवितरण ,लघुपट प्रदर्शन,युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीतील १२गडकिल्ल्यांची थ्रिडी प्रतिकृती प्रदर्शन , ५००दुर्मिळ पोस्ट तिकीटाचे प्रदर्शन,   विज्ञान प्रदर्शन व प्रयोग  अशा विविध कार्यक्रमाची  रसिक श्रोत्यांना मेजवानी मिळणार आहे. या लोकसंस्कृती साहित्य समेंलनात  नामवंत साहित्यिक, कवी, कथाकार व चित्रपट क्षेत्रातील कलावंत उपस्थित राहणार असल्याची माहिती रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा बिभीषण सचीव  प्रा ज्योती कवडेकर मद्देवाड यांनी दिली. 

संमेलनाचा आनंद घेण्यासाठी उदगीर परिसरातील साहित्यिक, कलावंत व रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन  रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने प्रा. बिभीषण मद्देवाड,, सचिव प्रा. ज्योती मद्देवाड, दादाराव  दाडगे ,अॅड  महेश मळगे, रसुल पठाण, रविंद्र हासरगुंडे, रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे, मारोती भोसले, महादेव खळूरे, सिद्घार्थ सुर्यवंशी, सचिन शिवशेट्टे, प्रल्हाद येवरीकर, जहाँगीर पटेल, निता मोरे, ज्ञानेश्वर बडगे, विवेक होळसंबरे,विक्रम हालकीकर ,टी. डी. पांचाळ, बालाजी भोसले, अर्चना पाटील, मनोहर लोहारे, हणमंत केंद्रे, नागनाथ गुट्टे आदीनी केले आहे.

Post a Comment

0 Comments