Type Here to Get Search Results !

उदगीर शहरात माता भिमाई रामजी आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी



 उदगीर | प्रतिनिधी

उदगीर शहरात माता भिमाई रामजी आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आंबेडकर पुतळ्यासमोर साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास नागरिकांची, सामाजिक कार्यकर्त्यांची व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

यावेळी जयंतीनिमित्त अभिवादन करून सामाजिक सलोखा, समता व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनिर्वाचित जिल्हा परिषद विजयी उमेदवार तसेच पंचायत समितीचे विजयी उमेदवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कारप्रसंगी वक्त्यांनी लोकशाही प्रक्रियेत जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पारदर्शक व विकासाभिमुख कामकाज करावे, असे आवाहन केले. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.यावेळी बाबासाहेब सुर्यवंशी, विद्यासागर डोरनाळीकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य डाॅ. दिपक सोमवंशी, उषाताई कांबळे, मुकेश भालेराव, दिलीप मटके उपस्थित होते. नवनियुक्त जि.प सदस्यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी डाॅ. गोविंद सोनकांबळे, संजय काळे, नगरसेवक व्यंकट बोईनवाड, धोंडीरामजी वाघमारे, अविनाश गायकवाड, बुद्धभूषण बाणाटे, धनाजी बनसोडे, विद्यासागर भाले, जे एस उमरगेकर, बंटी घोरपडे, योगेश मेघे, सुनील पकोळे, बालाजी गायकवाड, डॉ. ज्योतीताई सोमवंशी, जावेद लोणीकर, राहुल मटके, यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते. माता भीमाई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन बाबासाहेब सुर्यवंशी यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments