Type Here to Get Search Results !

हजारो लोकांसाठी रामभाऊ तिरुके देव माणूसच - तातेराव जाधव


 उदगीर (प्रतिनिधी) वाढवणा जिल्हा परिषद मतदार संघातून विजयी झालेले, भारतीय जनता पक्षाचे नेते तथा गोरगरिबांचे कैवारी आणि उदगीर तालुकाच नव्हे तर संपूर्ण लातूर जिल्ह्यातून हजारो रुग्णांना मदतीचा हात देऊन, मुंबईपर्यंत स्वखर्चाने जाऊन त्यांना मोफत औषधोपचार मिळवून देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणारे रामभाऊ तिरुके हे खरोखर देव माणूसच आहेत. अशी प्रतिक्रिया सुकनी येथील तातेराव जाधव यांनी व्यक्त केली आहे. 

सुकनी येथील सौ ज्योती तातेराव जाधव यांचा नातू , अवघ्या तीन दिवसाचा रुद्रांश लक्ष्मण चौथाईवाले रा. मौजे भवानी दाबका तालुका कमालनगर (कर्नाटक) येथून उपचारासाठी उदगीर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. दोन दिवसापासून उपचार सुरू होते. ज्योतीताई जाधव यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने आणि दवाखान्याचा खर्च जास्त येणार असल्याने बाळाच्या उपचारासाठी काय करावे? अशा धर्म संकटात सापडलेल्या या परिवाराला मदतीसाठी धावून येणारा देव माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून रामभाऊ तिरुके हेच होते! 

निवडणुका संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशीची ही घटना. अंगावर पडलेला गुलाल ही अजून निघाला नव्हता, मात्र त्यांना एक जान होती की, आपण कर्म धर्म संयोगाने गेल्या तीन-चार निवडणुका प्रत्येक वेळी मतदारसंघ बदललेला असताना देखील ज्या हजारो लोकांचे आपण प्राण वाचवण्या साठी कष्ट घेतले, त्या लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत. हा आदर्शवाद आणि संत परंपरेचा वारसा जपणाऱ्या, साहित्य, संस्कृती, क्रीडा, नाट्य अशा विविध क्षेत्रांमध्ये नैपुण्य प्राप्त असलेली ही व्यक्ती आज प्राधान्याने समाजसेवेसाठी लोकांच्या ध्यानीमनी आहे. या व्यक्तिमत्वाने रुद्रांश बद्दल माहिती समजताच त्या बाल रुग्णालयात जाऊन त्याच्या औषध उपचाराची पूर्ण सोय स्वखर्चाने केली. संबंधित डॉक्टरांना भेटून मदतीची भावना व्यक्त करून बिलाची काळजी करू नका, मी आहे. असे सांगून नगदी स्वरूपात काही बिल भरून त्या बालकाला जीवदान देण्याचे काम रामभाऊ तिरुके यांनी केले.

 रुद्रांश ला पूर्णपणे मोफत उपचार मिळावा. अशी व्यवस्था करून दिली. याच दरम्यान त्यांना हळी येथील चेअरमन बाबासाहेब काळे पाटील हे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचेही समजले, तेव्हा लगेच तातडीने त्यांनी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली, आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. धीर दिला, तसेच वाढवणा बुद्रुक येथील मनियार व जवळगा येथील युसुफ सय्यद यांचे वडील महबूब सय्यद यांचीही भेट घेऊन त्यांच्याही उपचाराबाबत ते ज्या ठिकाणी उपचार घेत होते, तेथील डॉक्टरांना चौकशी केली. केवळ अर्थकारणावरून उपचार थांबू देऊ नका. ही माणसे जगली पाहिजेत. ही माणसेच माझी संपत्ती आहे. या भावनेने, तळमळीने वागणारा माणूस म्हणून आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये देवदूत म्हणून रामभाऊ तिरुके यांच्याकडे लोक पाहत आहेत.

गरजूंच्या डोळ्यातील अश्रू पुसत असताना आज कित्येक लोक त्यांच्या माणुसकीची ही थट्टा उडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

एका बाजूला निवडणुकीची रणधुमाळी चालू, पक्षीय बलाबलाची चर्चा चालू असतानाच, रामभाऊ मात्र गोरगरिबांसाठी माझी कोणाला गरज आहे की काय? या भावनेने मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये धडपडत असलेले दिसून येत आहेत. तो त्यांचा हा आदर्श जर इतर राजकीय पुढार्‍यांनी घेतल्यास निश्चितच रुग्णसेवेला फार मोठ्या प्रमाणात हातभार लागेल. अशी खात्री आहे, अशा पद्धतीची ही प्रतिक्रिया आता मतदारसंघातून अनेक जण बोलून दाखवत आहेत.

Post a Comment

0 Comments