उदगीर तालुक्यातील करखेली गावातील घटना
उदगीर प्रतिनिधी:
उदगीर तालुक्यातील करखेली येथे जन्मदात्या मुलाने त्यांच्या आईला जमिनीवर आपटून खून केल्याची घटना २७ जानेवारी रोजी रात्री घडली आरोपीस उदगीर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली करखेली गावात मुलाने दारू पिण्यासाठी पैसे देण्याच्या कारणावरून आईला जमिनीवर आपटून खून केला आहे अशी माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी,पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे,नाना शिंदे,महेबूब सय्यद,अविनाश फुलारी,राजकुमार देवडे यांनी २७ जानेवारी रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास करखेली गावात घटनास्थळी भेट देऊन आरोपी सैलानी बक्षुद्दीन मुंजेवार वय 45 वर्ष या आरोपींला ताब्यात घेतले मुलाने त्यांची आई यासीनबी बक्षुद्दीन मुंजेवार वय 65 वर्ष यास केस धरून जमिनीवर अपटल्याने त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला,याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


Post a Comment
0 Comments