Type Here to Get Search Results !

युवा उद्योजक स्वप्निल अण्णा जाधव यांच्या वतीने सफाई कामगारांना बोनस वाटप


 उदगीर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षी बोनस वाटप बंद असल्याने तसेच वाढवणा ग्रामपंचायतच्या सफाई कामगारांना देखील दिवाळी बोनस मिळाला नसल्याने, कामगाराना दिवाळी साजरी करणे कठीण जात होते. त्यांची परिस्थिती विचारात घेऊन नव्यानेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये प्रवेश केलेले सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक यांनी वाढवणा येथील चंद्रकांत दत्तात्रय जोंधळे, संगीता प्रकाश गायकवाड, रेषाबाई विश्वनाथ कांबळे, मायादेवी सुरेश कांबळे, सतीश दशरथ गायकवाड, रेश्मा देवराव जाधव, दत्ता गोरे, झटिंग जाधव, आमिर पाटोदे, वामन केसगिरे, तानाजी सोमासे या सफाई कामगारांना आपल्या कंपनीच्या वतीने दिवाळी बोनस वाटप केले. 

याप्रसंगी वाढवणा येथील माजी सरपंच गणपत जाधव, रामदास जाधव, आरिफ खा पठाण, उस्मान आव्हाळे, पत्रकार हुकूमत शेख, शादूला आव्हाळे, माजी सरपंच शिवा हाळे, दशरथ गायकवाड, बालाजी हावरे, इस्माईल पठाण, सिकंदर कोठीवाले इत्यादी प्रमुख प्रतिष्ठित नागरिक याप्रसंगी उपस्थित होते. 

              शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सामाजिक कार्याचे धोरण डोळ्यासमोर ठेवून युवा उद्योजक स्वप्निल अण्णा जाधव यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघात आपले धडाकेबाज काम सुरू केल्याने महाविकास आघाडीमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अशी चर्चा आता सर्वात सुरू झाली आहे. सफाई कामगारांना दिलेल्या या बोनस वाटपामुळे सफाई कामगारांच्या वतीने युवा उद्योजक स्वप्निल अण्णा जाधव यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments