उदगीर शहरातील पूरग्रस्त मखबुल बावडी परिसरात अन्नधान्याचे वाटप.....
उदगीर प्रतिनिधी:- आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी मानव अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने उदगीर शहरातील पूरग्रस्त मखबुल बावडी परिसरात अन्नधान्याच्या किटची वाटप करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून सतत चालू असलेल्या पावसामुळे अतिवृष्टी झाली आणि त्या भागा त किमान 15 ते 20 घरात पाणी शिरले अन्नधान्याची नासाडी झाली सततच्या अतिवृष्टीमुळे हाताला काम नव्हते लहान मुलांचे शालेय साहित्य भिजून खराब झाले अक्षरशः झोपायला सुद्धा जागा नव्हती अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती परिसर चिखलमय झाला असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे प्रशासनाला या प्रकाराची माहिती नसल्यामुळे प्रशासनाची मदत मिळू शकली नाही राजकीय लोक येतात पाहणी करतात आणि फोटो सेशन करून निघून जातात ,असे त्या परिसरातील लोक म्हणाले सदरील घटना एका महिलेने फोनवरून मानवाधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांना कळवली असतात तात्काळ राज्य समन्वयक नितीन एकुरकेकर ,सुशील मादळे, बालाजी कारामुंगे ,श्रीआनंद उपाध्ये ,सुफीयां दायिमी यांनी तात्काळ अन्नधान्याचे किट त्याठिकाणी घेऊन जाऊन लोकांना वाटप केली व लहान मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी लवकरच शालेय साहित्य वाटप करणार असल्याची सांगितले त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना प्रशासनाच्या मदतीची गरज असून तात्काळ प्रशासनाने मदत करावी अशी मागणी मकबूल बावडी परिसरातील नागरिकांनी केली आहे लोकसहभागातून ही मदत मानव अधिकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य करीत आहे उदगीर - जळकोट तालुक्यातील व शहरातील अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ज्यांना अन्नधान्य, शालेय साहित्य ,वैद्यकीय मदत हवी असेल त्यांनी आमच्याशी ७०२८०४९३५८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य समन्वयक नितीन एकुरकेकर यांनी केली आहे.


Post a Comment
0 Comments