श्रावण मासानिमित्त देगलूर वझर येथे शिव महापुराण कथा – आमदार जितेश अंतापुरकर यांची प्रेरणादायी भाषण
देगलूर वझर (ता. देगलूर) येथे श्रावण मासानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक उत्साहात शिव महापुराण कथांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार जितेश अंतापुरकर साहेब विशेष उपस्थित राहून श्रद्धाळूंना मार्गदर्शन केले व कथासंबोधित भाषणातून शिवचरित्रातील आदर्श विचार मांडले.
कथाकार ह. भ. प. गुरुदाशी परमेश्वरी दीदी(परभणी, बीड) यांनी शिवमहापुराणातील प्रेरणादायी कथा, भक्तीचा महिमा व धर्मनिष्ठतेचे महत्व यांचे रसपूर्ण वर्णन केले. कार्यक्रमादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती, देगलूरचे संचालक शांताराम पाटील पळणीटर यांनी आमदार अंतापुरकर यांचा सत्कार केला.
यावेळी गावाच्या विकास योजनेसंदर्भात निवेदनही आमदार साहेबांना देण्यात आले. कार्यक्रमास उपसरपंच नरसिंगराव चोरमले, विजयकुमार पाटील, भिवाजी लवटे, सुभाष चोरमले, श्रीराम सावळे, वामन मध्ये, सुभाष वजीरे, किरण जाधव, भागवत कुडले, राहुल जाधव, धनाजी लवटे, आनंद पांढरे, राजकुमार जाधव, राजकुमार पांचाळ, गणपत लवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवमहापुराण कथा प्रसंगी ग्रामस्थ व श्रद्धाळू मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक वातावरणात सहभागी झाले. आमदार अंतापुरकर यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment
0 Comments