Type Here to Get Search Results !

सुरज चव्हाण यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली

महाराष्ट्राला यशवंतराव जी चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा वारसा आहे त्याचाच आदर्श मानून आमचे नेते अजित दादा पवार काम करतात आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना  महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो आहोत मात्र अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत त्याबद्दल कार्यकर्त्याच्या मनात संताप होता छावा संघटना ही संघटना अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे त्यामुळे आम्हाला ही संघटना बंधूसंघटना वाटते त्यांनी प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणे हे आम्ही समजू शकतो. तो त्यांचा अभिनव आंदोलनाचा प्रकार असू शकतो परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्याबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करीत शिवीगाळ केली ते ऐकून कार्यकर्त्याकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला अर्थात तो घडायला नको. होता परंतु दुर्दैवाने घडून गेला. त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.
 

Post a Comment

0 Comments