उदगीर / चला कवितेच्या बनात अंतर्गत गेल्या 14 वर्षापासून अखंडित चालू असलेले वाचक संवाद 141 वे.
सुशांतजी शिंदे उपजिल्हाधिकारी यांनी इंद्रजीत भालेराव लिखित तुमची आमची माय साहित्यकृतीवर अत्यंत प्रभावी संवाद साधले यावेळी ते बोलताना म्हणाले की,लळा- जिव्हाळा आत असावा नको उमळा- वरकरणी.कधी न धरावा गर्व मनाचा,लीन रहावे प्रभू चरणी.
या काव्यपंक्तीप्रमाणे एका वारकरी संप्रदायाच्या समृद्ध घरातून महानुभाव पंथीय झोपडीत येऊन सहा एकर शेतीची 106 एकर जमीन करत केवळ कुटुंबाला समृद्ध केले नाही तर महानुभाव पंथाचा स्वीकार करून समाजापुढे आदर्श ठेवणाऱ्या अम्मा अर्थात इंद्रजीत भालेराव यांच्या आईच्या जीवनाला उजागर करणारी तुमची आमची माय ही साहित्यकृती असून याची मांडणी तीन भागात केलेली आहे.भाग एक स्वतः इंद्रजीत भालेराव यांनी लिहलेले लेख दुसऱ्या भागात नात्यातील इतरांनी मांडलेले त्यांचे अनुभव व मत भाग तीन मध्ये नात्याबाहेरील मान्यवरांनी व्यक्त केलेले अनुभव रुपी कथन.ही साहित्यकृती आपआपल्या आईची मायेची ऊब देणारी अत्यंत प्रेरणादायी आहे.यावेळी अनेकांनी सुंदर चर्चा घडवून आणली यावेळी उपस्थितांना जन्मदिनांची ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.शेवटी अध्यक्षीय समारोप करताना डॉ उटगे म्हणाले की,कुटुंबातील डोळसदृष्टी असणारी आई संसाराला कोणाची दृष्टी न लागू देता समृद्धीकडे घेऊन जाते.तसेच समाजाला समृद्ध करणारी वाचक संवाद ही चळवळ आहे याचा लाभ घ्यावा.
शासकीय दूध डेरी सभागृहात संपन्न झालेल्या मात्रगौरवी वाचक संवादाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध नाट्यलेखक तुळशीदास बिरादार यांनी केले तर संवादाचा परिचय रिझर्व बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मुरलीधर जाधव यांनी करून दिला व आभार हनुमंत म्हेत्रे यांनी मानले.व या कार्यक्रमात प्रकाश बिरादार व कचरूलाल मुदंडा यांचे कविता सादरीकरण झाले.

Post a Comment
0 Comments